Saturday, September 19, 2026
Homeदेश-विदेशOperation Sindoor: 'आम्ही आधीच इशारा दिला होता', परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानची पोलखोल!

Operation Sindoor: ‘आम्ही आधीच इशारा दिला होता’, परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानची पोलखोल!

[ad_1]

Operation Sindoor: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने अलीकडेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारताच्या या कृतीने हादरलेल्या पाकिस्तानने प्रथम आपल्या लोकांना मूर्ख बनवण्यासाठी सोशल मीडियावर अनेक बनावट बातम्या पसरवल्या आणि नंतर सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यामुळे सीमावर्ती भागात अनेक निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. गुरुवारी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पत्रकार परिषद घेतली आणि पाकिस्तानसोबतच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.

कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानचा केला पर्दाफाश 

कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, ‘7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत भारताने स्पष्टपणे सांगितले होते की आमची कारवाई जाणिवपूर्वक, मर्यादित आणि चिथावणीशिवाय करण्यात आली होती. कोणत्याही पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले गेले नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. भारतीय लष्करी तळांवर हल्ला झाल्यास त्याला निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल, असेही पुनरुच्चार करण्यात आले. 7-8 मे च्या रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या भागांचा समावेश होता.

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकव्याप्त काश्मिर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी स्थळांना निशाण बनवल्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेजवळ गोळीबार करण्यात आला. यानंतर भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्यदलाकडून यासंदर्भात महिती देण्यात आली.

पाकिस्तानी सैन्य ठिकाणांना निशाणा बनवलं नव्हत. पण भारतीय सैन्यावर हल्ला झाल्यास जशास तसे उत्तर दिलं जाईल, असंही म्हटलं होतं. पण पाकिस्तानने भारताच्या काही शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो निष्क्रिय करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र सचिवांकडून देण्यात आली. 

पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. सीमेजवळी भागांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला गेला. यात 16 नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने त्याच तिव्रतेने प्रतिक्रिया दिली. लाहोरमधील एअर डिफेन्स रडार निष्क्रिय करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आला.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments