Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सौं. प्रियदर्शनी भोसले यांची बिनविरोध निवड

फलटण नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सौं. प्रियदर्शनी भोसले यांची बिनविरोध निवड

फलटण :-फलटण नगरपालिकेच्या सभागृहात आज उपनगराध्यक्ष निवडीसाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी सौं. प्रियदर्शनी भोसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे फलटणच्या राजकीय वर्तुळात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सौं. प्रियदर्शनी भोसले यांना राजकीय वारशाची पार्श्वभूमी लाभली आहे. त्यांचे सासरे दिलीपसिंह भोसले यांनी यापूर्वी फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून यशस्वी कामकाज केले आहे, तर त्यांच्या सासू सौं. मधुबाला भोसले यांनी नगरसेविका म्हणून नागरिकांच्या प्रश्नांसाठी सक्रिय भूमिका बजावली होती. या अनुभवाचा लाभ शहराच्या विकासासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याच विशेष सभेत स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक सुदामराव मांढरे व अशोकराव जाधव, तसेच शिवसेनेचे श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे नगरपालिकेच्या कामकाजाला अधिक बळ मिळणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या सर्व निवडींबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, ॲड. नरसिंह निकम, अभिजित नाईक निंबाळकर तसेच सर्व नगरसेवकांनी अभिनंदन केले. फलटण शहराच्या विकासासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांकडून प्रभावी व लोकाभिमुख कार्य होईल, अशी अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments