[ad_1]
Ladaki Bahin yojana : राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहे. या योजनेचे पहिल्या दोन महिन्यांचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले. आपल्या खात्यात पैसे आले की नाही, तसेच हे पैसे काढण्यासाठी शुक्रवारी बँकेत मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणींची झुंबड उडाली होती. मोठ्या प्रमाणात महिला आल्याने बँकेच्या व्यवस्थापनावर देखील ताण आला. काही महिलांचे केवायसी नसल्याने त्यांना त्यांच्या खात्यात पैसे आले की नाही हे पाहण्यासाठी गर्दी केली होती. तर अनेक महिलांनी पासबूक घेऊन ते अपडेट करण्यासाठी रांगा लावल्या होत्या.
[ad_2]
Source link
