Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशIsrael Hamas War | इस्रायल-हमासचा युद्धबंदीचा ठराव UN मध्ये मंजूर, जाणून घ्या...

Israel Hamas War | इस्रायल-हमासचा युद्धबंदीचा ठराव UN मध्ये मंजूर, जाणून घ्या भारताने कोणच्या बाजूने मतदान केलं! | Navarashtra (नवराष्ट्र)

Israel Hamas War | इस्रायल-हमासचा युद्धबंदीचा ठराव UN मध्ये मंजूर, जाणून घ्या भारताने कोणच्या बाजूने मतदान केलं! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

इस्रायल-हमासचा युद्धबंदीचा ठराव UN मध्ये मंजूर, जाणून घ्या भारताने कोणच्या बाजूने मतदान केलं!

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत युद्धबंदीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. जगातील 153 देशांनी युद्ध थांबवण्याच्या बाजूने मतदान केले आहे.

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरु असलेल्या युद्धाला दोन महिने पुर्ण झाले आहेत. या युद्धात दोन्ही देशातील हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. काही दिवसांपुर्वाी दोन्ही देशाने युद्धबंदीचा प्रस्ताव स्विकारत अनेक लोकांची सुटकाही केली. आता मात्र, हे युद्ध पुर्णपणे थांबाव अशी मागणी होत आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्र महासभेत  युद्ध थांबवण्याच्या बाजूने मतदान घेण्यात आलं. जगभरातील 153 देशांनी इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेले युद्ध (Israel Hamas War) थांबवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. भारतानेही संयुक्त राष्ट्र महासभेत युद्ध थांबवण्याच्या बाजूने मतदान केले आहे. त्यामुळे हे युद्ध आता थांबेल अशी आशा वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी आणलेल्या प्रस्तावावर अमेरिकेने व्हेटो केला होता. मानवाधिकारांचे संरक्षण करण्यात संयुक्त राष्ट्र संघ अपयशी ठरल्याबद्दल अनेक देशांनी टीका केली होती, मात्र आता हा ठराव मंजूर झाल्याने गाझा पट्टीत सुरू असलेले हल्ले थांबवण्यासाठी इस्रायलवर दबाव आणला जात आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments