Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशIndian Railway | चार टीटीईंनी धडक कारवाई करत भरली रेल्वेची तिजोरी; फुकट्या...

Indian Railway | चार टीटीईंनी धडक कारवाई करत भरली रेल्वेची तिजोरी; फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 4 कोटींचा वसूल केला दंड | Navarashtra (नवराष्ट्र)

Indian Railway | चार टीटीईंनी धडक कारवाई करत भरली रेल्वेची तिजोरी; फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 4 कोटींचा वसूल केला दंड | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

चार टीटीईंनी धडक कारवाई करत भरली रेल्वेची तिजोरी; फुकट्या प्रवाशांकडून तब्बल 4 कोटींचा वसूल केला दंड

भारतात विना तिकीट (Without Tickets) रेल्वेने अनेक लोक प्रवास करतात. अशा प्रवाशांमुळे रेल्वेला फक्त तोटा होत नाही, तर गाड्यांमधील वाढत्या गर्दीमुळे सहप्रवाशांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी रेल्वे वेळोवेळी तिकीट तपासणी मोहीमही राबवते.

नवी दिल्ली : भारतात विना तिकीट (Without Tickets) रेल्वेने अनेक लोक प्रवास करतात. अशा प्रवाशांमुळे रेल्वेला फक्त तोटा होत नाही, तर गाड्यांमधील वाढत्या गर्दीमुळे सहप्रवाशांचे हाल होतात. हे टाळण्यासाठी रेल्वे वेळोवेळी तिकीट तपासणी मोहीमही राबवते. मध्य रेल्वेचे असे चार टीटीई (TTE) आहेत ज्यांनी एका वर्षात तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून सुमारे चार कोटी रुपयांचा दंड (Fine Collect) वसूल केला आहे.

यामध्ये मुंबई विभागातील सुनील नैनानी यांनी सर्वाधिक दंड वसूल केला आहे. मध्य रेल्वेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. 1 एप्रिल ते 13 ऑक्टोबर 22023 दरम्यान, सुनील नैनानी यांनी 10,428 प्रवाशांकडून 1,00,02,830 कोटी रुपयांचा दंड वसूल केल्याचे रेल्वेने सांगितले. तर वर्षभरात नैनानी यांनी 18,413 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 1.62 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. याशिवाय, भीम रेड्डी यांनी 11,178 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 1.03 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. एमएम शिंदे यांनी 11,145 तिकीट प्रवाशांकडून 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केला. तर आरडी बहोत यांनी 11,292 तिकीट नसलेल्या प्रवाशांकडून 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments