फलटण: फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर फलटण प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात , भक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला .
माननीय सौ वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर चेअरमन शाळा समिती मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . उपस्थित विद्यार्थी शिक्षक पालक यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली . यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन संगीत कवायत देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांचे मने जिंकली . विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शालेय वातावरण देशभक्ती च्या भावनेने भारावून गेले . कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला .
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिताराणी कुमार कुचेकर , यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला .
कार्यक्रमाला माननीय श्रीमती निर्मला रणवरे मॅडम निमंत्रित सदस्य, माननीय श्री किशोर सिंह नाईक निंबाळकर माजी नगरसेवक, माननीय सौ रजपूत मॅडम मुख्याध्यापिका मुधोजी बालक मंदिर, माननीय सौ गोसावी मॅडम मुख्याध्यापिका नवीन प्राथमिक तसेच बहुसंख्येने पालक शिक्षक विद्यार्थी व उपस्थित मान्यवरांच्या सहभागाने स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला .
कार्यक्रमासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .
