Sunday, September 13, 2026
Homeसातारादक्षिण काशी श्री क्षेत्र फलटण येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार...

दक्षिण काशी श्री क्षेत्र फलटण येथे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिन उत्साहात साजरा

फलटणः महानुभाव पंथाच्या संस्थापक, समाज सुधारक आणि विश्वबंधुता व सामाजिकतेचे प्रतिपादन करणारे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन आज, ५ सप्टेंबर रोजी, श्री क्षेत्र फलटण येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभरात राज्य शासनाच्या स्थरावर हा उत्सव संपन्न झाला. भगवान श्री चक्रधर स्वामींनी सत्य, अहिंसा, समता आणि प्रेमाच्या मार्गाने समाजाला एकेश्वर भक्तीचा संदेश दिला आणि स्त्रियांना संन्यासाचा अधिकार दिला.

फलटण येथील श्रीचक्रपाणी जन्मस्थान मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्यात अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष आणि श्रीकृष्ण देवस्थन ट्रस्ट फलटणचे अध्यक्ष कवीश्वर कुळाचार्य महंत श्री विदवांस बाबा यांच्या प्रमुख उपस्थितीत धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पु. सुदामबाबा, पु. मुकुंदराज बाबा, पु. मचालेबाबा, पु. परशराज बाबा आणि सेवा समर्पण गृपचे पदाधिकारी, तसेच माजी खासदार मा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य जिजामाला नाईक निंबाळकर यांची विशेष उपस्थिती होती.

धर्मसभेत मान्यवरांनी भगवान चक्रधर स्वामींच्या ब्रह्मविद्या तत्त्वज्ञानाचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्दिष्टासाठी मार्गदर्शन केले. या प्रसंगी शोभायात्रा काढण्यात आली, तसेच स्वामींना मंगल अभिषेक, पुष्पहार व विडा अर्पण करण्यात आले. महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप झाले. कार्यक्रमाचे आभार विश्वस्त श्री बाळासाहेब ननावरे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments