
एका अधिकाऱ्याने सांगितले की, नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या दाखल्यासाठी गावातील तलाठी यांच्याशी संपर्क साधून स्वयंघोषित उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. हे प्रमाणपत्र देण्यापूर्वी गावातील तलाठी सर्व बाबी तपासून घेत असतात. सध्या पूजा यांचा प्रोबेशन काळ हा रद्द करण्यात आला आहे. त्यांना मसूरी येथे बोलावण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने दावा केला आहे की, आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्रासाठी अर्जासह कागदपत्रे सादर करताना आईचे वार्षिक उत्पन्न साडेसहा लाख रुपये जाहीर केले होते. मात्र, यात घोळ असल्याचा संशय आहे.










