Friday, August 14, 2026
Homeदेश-विदेशHit And Run Case Controversy | केंद्र सरकारचे ट्रक चालकांना कामावर परतण्याचे...

Hit And Run Case Controversy | केंद्र सरकारचे ट्रक चालकांना कामावर परतण्याचे आवाहन, कायदा लागू करण्यापूर्वी ट्रक ड्रायव्हर्स असोसिएशनसह सर्व पक्षांशी होणार चर्चा | Navarashtra (नवराष्ट्र)

Hit And Run Case Controversy | केंद्र सरकारचे ट्रक चालकांना कामावर परतण्याचे आवाहन, कायदा लागू करण्यापूर्वी ट्रक ड्रायव्हर्स असोसिएशनसह सर्व पक्षांशी होणार चर्चा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

केंद्र सरकारचे ट्रक चालकांना कामावर परतण्याचे आवाहन, कायदा लागू करण्यापूर्वी ट्रक ड्रायव्हर्स असोसिएशनसह सर्व पक्षांशी होणार चर्चा

हिट अँड रन प्रकरणाच्या नव्या तरतुदीबाबत देशभरातील वाहनचालक संपावर गेले होते. ट्रक आणि बस चालकांच्या देशव्यापी संपानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

नवी दिल्ली : भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने भारतीय न्यायिक संहितेच्या हिट अँड रन प्रकरणाला (Hit And Run Case Controversy) स्थगिती दिली आहे. हिट अँड रन प्रकरणाच्या नव्या तरतुदीबाबत देशभरातील वाहनचालक संपावर गेले होते. ट्रक आणि बस चालकांच्या देशव्यापी संपानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ट्रक चालकांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. गृह सचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, केंद्र सरकारने नवीन कायदा लागू करण्यापूर्वी ट्रक ड्रायव्हर्स असोसिएशनसह सर्व पक्षांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

गृह मंत्रालयाने जारी केलं निवेदन

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सांगितले की, आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. सरकारच्या वतीने मी तुम्हाला सांगू इच्छितो की नवीन नियम अद्याप लागू झालेला नाही. गृह मंत्रालयाच्या वतीने आम्ही सांगत आहोत की भारतीय न्यायिक संहिता 106/2 लागू करण्यापूर्वी आम्ही ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या प्रतिनिधींशी चर्चा करू आणि त्यानंतरच आम्ही कोणताही निर्णय घेऊ.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments