Monday, September 14, 2026
HomeUncategorizedफलटण येथे खासदार ग्रुप व मेहबूबभाई मेटकरी मित्र मंडळ आयोजित भव्य दहीहंडी...

फलटण येथे खासदार ग्रुप व मेहबूबभाई मेटकरी मित्र मंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सव

फलटण येथे खासदार ग्रुप व मेहबूबभाई मेटकरी मित्र मंडळ आयोजित भव्य दहीहंडी उत्सव

फलटण – खासदार ग्रुप व मेहबूबभाई मेटकरी मित्र मंडळ फलटण यांच्यावतीने मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या विविध कार्यक्रम सुद्धा होणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मेहबूबभाई मेटकरी यांनी दिली.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत खासदार ग्रुप व मुंबई मित्र मंडळ तर्फे मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी उमाजी नाईक चौक फलटण येथे भव्य दहीहंडी उत्सव होणार असून यावेळी तालुक्याचे ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील माजी नगरसेवक समशेरसिंह नाईक निंबाळकर माजी जिल्हा परिषद सदस्या अॅड जिजामाला नाईक निंबाळकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या दहीहंडी उत्सवासाठी 1,11,111 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या भव्य दिव्य दहीहंडी उत्सवामध्ये महाराष्ट्राची लाडकी नृत्य कलाकार सायली पाटील, पुण्याच्या डीजे सोना, मुळीक साउंड हे प्रमुख आकर्षण राहणार असून या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मेहबूबभाई मेटकरी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments