Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशभारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन

नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचं वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं. प्रकृती खालवल्यामुळे त्यांना आज सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रात्री १० वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

डॉ. सिंग यांनी भारताला १९९१ च्या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मोलाची भूमिका बजावली होती. त्यांच्या नेतृत्वाखालील सुधारणा आणि धोरणांनी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक स्थैर्य दिलं. त्यांच्या जाण्यामुळे देशाने एक दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आणि अद्वितीय अर्थतज्ञ गमावला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments