Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रप्रेम जपताना सुरक्षिततेचा विचार करा: निर्जन स्थळी जाण्याआधी सावधगिरी बाळगा

प्रेम जपताना सुरक्षिततेचा विचार करा: निर्जन स्थळी जाण्याआधी सावधगिरी बाळगा


पुणे :- आपलं प्रेम आणि एकमेकांसोबत घालवलेला वेळ जितका महत्त्वाचा आहे, तितकीच महत्त्वाची आपली सुरक्षा आहे. अनेकदा जोडपी आणि मित्र मैत्रिणी खासगी वेळ घालवण्यासाठी निर्जन ठिकाणी रात्री अपरात्री जातात. मात्र, अशा ठिकाणी जाताना सुरक्षिततेचा विचार करणं अत्यावश्यक आहे.

समाजात काही विकृत प्रवृत्तीचे लोक असतात, जे अशा क्षणांचा गैरफायदा घेऊ शकतात. आपल्या खासगी क्षणांचा अपमान करत, त्रास देण्याचा किंवा अत्याचार करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या दृष्टिकोनात फक्त स्वार्थ असतो आणि ते आपल्या सुरक्षिततेची पर्वा करत नाहीत.

त्यामुळे, निर्जन ठिकाणी जाताना काळजी घेणं गरजेचं आहे. प्रेम आणि मैत्री जपणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच या नात्यांची सुरक्षा करणं ही महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एकांतात वेळ घालवण्यासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर नेहमी सुरक्षित जागा निवडा आणि सावधगिरी बाळगा. नात्यांमध्ये एकमेकांना वेळ देणं महत्त्वाचं आहे, पण एकमेकांची सुरक्षितता जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

नुकतीच पुण्यात एक दुर्दैवी घटना घडली, ज्यात सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. ‘राईट टू लव्ह’ चळवळीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही जोडप्यांना आणि मित्र मैत्रिणींना यानिमित्ताने एक महत्त्वाचा संदेश देऊ इच्छितो की, प्रेम करताना आणि एकमेकांबरोबर वेळ घालवताना, नेहमी आपल्या सुरक्षिततेचा विचार करा.

के. अभिजीत
राईट टू लव्ह | अनहद सोशल फाऊंडेशन
मो. 9766479547

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments