Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशDY Chandrachud : सुनावणी सुरू असतानाच वकील मोबाइलवर बोलू लागला, चंद्रचूड असे...

DY Chandrachud : सुनावणी सुरू असतानाच वकील मोबाइलवर बोलू लागला, चंद्रचूड असे काही भडकले की…

DY Chandrachud : सुनावणी सुरू असतानाच वकील मोबाइलवर बोलू लागला, चंद्रचूड असे काही भडकले की…

[ad_1]

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर आज सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्ट रूम १ मध्ये सुनावणी सुरू असताना ही घटना घडली. कोर्ट कॉम्प्लेक्समधील हॉलमध्ये एका वकिलानं फोनवर बोलणं सुरू केलं. त्यांच्या बोलण्याचा अडथळा आल्यानं सरन्यायाधीशांनी सुनावणी मध्येच थांबवली आणि त्या व्यक्तीला समज दिली. ‘तुम्ही इथं फोनवर बोलू शकत नाही. हा बाजार नाही, असं सरन्यायाधीश हिंदीत म्हणाले. त्यांचा मोबाईल ताब्यात घ्या, अशी सूचना सरन्यायाधीशांनी कर्मचाऱ्यांना केली. त्यानंतर न्यायालयीन कर्मचाऱ्यानी संबंधित वकिलाचा फोन ताब्यात घेतला. यानंतर सरन्यायाधीशांनी त्या वकिलाला ताकीद दिली. ‘तुम्ही न्यायालयीन नियमांचं आणि मर्यादेचं पालन करायला हवं. यापुढं असं होणार नाही याची काळजी घ्या, असं त्यांनी सुनावलं. यानंतर संबंधितानं सरन्यायाधीशांची माफी मागितली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments