मौजे सासकल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

0
5
मौजे सासकल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मौजे सासकल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

फलटण : मौजे सासकल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात, शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने काढण्यात आलेली भव्य-दिव्य मिरवणूक गावातील मुख्य आकर्षण ठरली. यावेळी युवा उद्योजक लहुराजे सावंत, रघुनाथ गणपत मुळीक, प्रशांत साहेबराव मुळीक(मिस्त्री), जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून वंदन पूजन केले. मिरवणुकीच्या ट्रॉलीचे सारर्थ्य अक्षय भानुदास घोरपडे, अक्षय गार्डे यांनी केले.

यावर्षीच्या जयंती महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे जयंती महोत्सव समितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दान देण्यात आला. हा पुतळा आयु. माणिकराव घोरपडे (तात्या) यांनी उदार मनाने दान दिला असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्या या योगदानामुळे समाजामध्ये एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

मिरवणुकीची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य संजय घोरपडे यांनी केलेल्या बुद्ध वंदनेने करण्यात आली. त्यानंतर अत्यंत शीतल व संयमित आवाजात डीजेवर भीम गीतांचा सुरेल नाद सुरू झाला. डीजेचा आवाज कुठेही कर्णकर्कश नसून, मर्यादित आणि सुसंस्कृत ठेवण्यात आला होता. या भीम गीतांच्या तालावर तरुणाईने उत्स्फूर्तपणे नृत्य करत मिरवणुकीत सहभाग घेतला.

मिरवणुकीदरम्यान संपूर्ण वातावरण “जय भीम”च्या घोषणांनी दुमदुमून गेले होते. गावातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वत्र शिस्त, एकता आणि सामाजिक बांधिलकीचे सुंदर दर्शन घडले. यावेळी फटाक्यांची मर्यादित आतिशबाजी ही करण्यात आली. ही जयंती शांततेत आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्याबद्दल जयंती महोत्सव समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

यावेळी जयंती महोत्सव समिती चे प्रमुख दीपक घोरपडे, मधुकर घोरपडे, माणिकराव घोरपडे, बी.डी घोरपडे, लक्ष्मण निकाळजे, बौध्दाचार्य संजय प्र. घोरपडे, पोलिस उपनिरीक्षक विशाल श्रीमंतराव घोरपडे, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य श्रीमंतराव घोरपडे, अक्षय घोरपडे, नंदकुमार जगन्नाथ घोरपडे, किशोर घोरपडे, नितीन धनाजी घोरपडे, किरण घोरपडे, शैलेश घोरपडे, उत्तम बापूराव लोंढे, कुंदन घोरपडे, राजेंद्र प्र घोरपडे, हणमंत घोरपडे, संजय नामदेव घोरपडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र धोंडिबा घोरपडे, सौरभ घोरपडे, विशाल हणमंत घोरपडे, अमित घोरपडे,मनोहर नाथुजी घोरपडे, वंचित बहुजन आघाडी च्या सातारा पूर्वचे माजी अध्यक्ष भीमराव घोरपडे, भारतीय बौद्ध महासभा शाखा सातारा जिल्हा पूर्व चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे व बौद्ध उपासक – उपासिका, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.