Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रदिमाखदार बौद्ध समाज मेळावा , पँथरची आक्रमकता, वैचारिक परिपक्वता, अन न्यायिक अभ्यास...

दिमाखदार बौद्ध समाज मेळावा , पँथरची आक्रमकता, वैचारिक परिपक्वता, अन न्यायिक अभ्यास असा सर्वसमावेशक मेळावा.

फलटण : दि २५ ऑगस्ट रोजी फलटण शहरात बौद्ध समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या एकच निर्धार ,बौद्ध आमदार हे  ब्रीद वाक्य घेऊन या ऐतिहासिक महामेळाव्यासाठी फलटण कोरेगाव विधान सभा मतदार संघातून हजारोच्या संख्येने भिम अनुयायी भर पावसात ही उपस्थिती होते . या महामेळाव्यासाठी जसे भिम अनुयायी उपस्थिती होते तसे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व समाजाचे प्रतिनिधींनी ही याठिकाणी सहभागी होऊन बौद्ध आमदार होण्यासाठी जाहिर पाठींबा ही देत होते . तसेच अनेक पत्रकार ही महामेळाव्यास उपस्थिती होते . उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना ) निखिल पवार फलटण शहर मुख्य यांनी त्यांच्या पक्षाकडे पंढरपूऱच्या मेळाव्यामध्ये दानवे यांच्याकडे बौद्ध समाजाच्या उमेदवारीसाठी मागणी केली होती तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून दलित कार्यकर्त्यांना बैठकीसाठी बारामती येथे  बोलविले आहे  तसेच शरद पवार व रोहित पवार यांनी बौद्ध महामेळाव्यासाठी शुभेच्छा ही दिल्या आहेत . भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी विधानसभेसाठी बौद्ध समाजाच्या आमदार मिळावा   यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत .                                     

        आजच्या या ऐतिहासिक सोहळ्याचे आपण आज सर्वच जण साक्षीदार बनू . एकी मधील ताकतीच मर्म खऱ्या अर्थाने जाणू . फक्त समाज महत्वाची , सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आणि प्रत्येक दिशा समाज हिताच्या तत्वावाची , ही एकच जाणिव मनामध्ये मनापासून असणार आहे . खऱ्या अर्थाने केवळ संघटन झाल्याने दिसणार आहे . म्हणूनच व्यक्तीपरत्वे काही सकारात्मक विचार काही नकारात्मक विचार निश्चितच आज प्रत्येकाच्या उंबरठ्याच्या आत राहतील आणि या संघटनात्मक एकीला संघटनात्मक एक विचाराला एक नवी दिशा देतील एक नवी दिशा देतीला !                

राजकारणाने समाजात तुकडे होतात.पण फलटण मध्ये राजकारणाने समाज संघटित झाला आहे. ते सुद्धा वयक्तिक मतभेद विसरून.
ही फलटण च्या द्रुष्टीने ऐतिहासिक घटना आहे.एकच निर्धार! बौद्ध आमदार! हे ब्रीदवाक्य घेऊन फलटण मधील आंबेडकरी बांधवांनी 13 जुलै ते २४ आगस्ट या काळात बैठका, विचार मंथन घडवून सर्वपक्षीय एकता केल्यानंतर तालुक्यातील बांधवांसाठी संपर्क अभियान सुरू झाले. ३० युवक, तरुण, ज्येष्ठ सायंकाळी ६ ते रात्री१२ पर्यंत स्वखर्चाने जन संपर्क अभियान चालवले.
ग्रामीण भागातील बांधवांनी या अभियानाला चांगला प्रतिसाद दिला.
यामुळे २५ आगस्ट रोजी समाजाची जनसंख्या दाखविण्यासाठी महामेळाव्याचे आयोजन केले.
हा महामेळावा समाजाच्याच आर्थिक ताकदीने व्हावा असे ठरले.अहवान केले. समाज बांधवांनी यथाशक्ती योगदान दिले.
अन जबरदस्त दिमाखदार मेळावा संपन्न झाला.
मेळाव्याच्या आंबेडकरी विचार पिठावर फलटण मधील सर्व जाती धर्माचे बांधव स्थानापन्न होते. अन संयोजकातील फक्त एक-दोन कार्यकर्ते स्टेजवर अन सर्व समिती स्टेज खाली बसले होते ही एक चांगली व्यवस्था होती.

🔹अँड शाम अहिवळे- यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन करताना अत्यंत अभ्यासपूर्ण अन् मोजक्या शब्दात विचार व्यक्त केले.
🔹सनी काकडे- यांच्या भाषणाने पँथर च्या काळाच्या भाषणांची आठवण झाली. यामुळे सर्वांमध्ये उत्साह निर्माण झाला.
सचिन अहिवळे – यांनी अत्यंत प्रगल्भ, मेळाव्याला अपेक्षित, समाजाला प्रतिनिधित्व मिळेल असे आपले मुद्दे परिणामकारक मांडले.
तर रमेश आढाव म्हणाले – सर्व जाती धर्माच्या बांधवांनी बौद्ध आमदार होण्यासाठी अखंड साथ द्यावी.
यावेळी उपस्थित इतर जाती धर्म बांधवांनी बौद्ध समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला.
सचिन मोरे व काकडे ताईंनी योग्य सुत्रसंचालन केले तर शक्ती भोसले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
यावेळी प्रबोधन व मनोरंजनात्मक कार्यक्रम झाला.
समाजातील बहुतांश बांधवांनी खूपच चांगला मेळावा झाला अशी प्रतिक्रिया दिल्या.आता पुढे काय असाही प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.

त्यामुळे गेली कित्येक दिवसांपासून बौद्ध समाजाला उमेदवारी दिली पाहिजे, बौद्ध समाजाचा आमदार झाला पाहिजे. ही भावना बैठकांद्वारे मतदारसंघातील गावां गावांमध्ये जाऊन पोहचलेली आहे. अजूनही बैठकांवर बैठका सुरूच आहेत. फलटण तालुक्यासह उत्तर कोरगावातील गांवे बौद्ध आमदार होण्यासाठी पिंजून काढली जात आहेत. बैठकांची ताकत ही घरा घरात जाऊन पोहचलेली आहे.या बैठकांना लोकांची उपस्थिती सुद्धा पाहायला मिळत आहे. यावरूनच लक्षात येते की, यंदा बौध्द समाजाला उमेदवारी मिळाली पाहिजे हेच चित्र आहे. बौद्ध समाज बांधवच नव्हे तर इतर समाज बांधव सुद्धा या मागणीस प्रतिसाद देऊ लागलेले आहेत. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा विश्वास सुद्धा व्यक्त केला जात आहे. “एकच निर्धार, बौद्ध आमदार “हा नारा मतदारसंघात घुमू लागल्याने इथल्या प्रमुख राजकीय पक्षांना व नेत्यांना सुद्धा बौध्द बांधवांचा हा नारा विचारात घ्यावा लागणार आहे.

संघटण हे एकीत असतं . ……! ते गुणाकारात वाढलं पाहिजे . बौद्ध समाजाचयं नेतृत्व आता ..! विधान सभेत धाडलं पाहिजे .

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments