Monday, August 31, 2026
Homeमहाराष्ट्रDevendra Fadnavis: २० आमदार फोडल्याची जाहीर कबुली देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची...

Devendra Fadnavis: २० आमदार फोडल्याची जाहीर कबुली देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची मागणी

Devendra Fadnavis: २० आमदार फोडल्याची जाहीर कबुली देणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना अटक करण्याची मागणी

[ad_1]

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे २० आमदार फोडल्याची जाहीर कबुली देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केली आहे. ‘२० आमदार फोडले असं स्वतः गृहमंत्री फडणवीस गर्वाने सांगतात… हे आमदार फडणवीसांनी दहीभात देऊन की जादुने फोडले? पैसे, ईडी आणि सीबीआयच्या धमक्या देऊनच फोडले ना… प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपये दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे पैसे कुठून आणले? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ईडी, सीबीआयद्वारे याची चौकशी करणार आहे का? तरच तुम्हाला भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार आहे.’ असं संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पुण्यात बालेवाडी येथे सुरू असलेल्या भाजप महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत बोलत होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments