Friday, October 16, 2026
Homeफलटणआढाववस्ती येथे १९ ते २८ ऑक्टोबरदरम्यान श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर

आढाववस्ती येथे १९ ते २८ ऑक्टोबरदरम्यान श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर

आढाववस्ती येथे १९ ते २८ ऑक्टोबरदरम्यान श्रामणेर बौद्धाचार्य शिबिर

फलटण : भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा सातारा (पूर्व) यांच्या वतीने BSI मिशन २५ अंतर्गत भव्य श्रामणेर बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन आढाववस्ती (गुणवरे), ता. फलटण येथे करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवार, दि. १९ ऑक्टोबर ते बुधवार, दि. २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत होणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५६ मध्ये धम्माची दीक्षा देऊन ७० वर्षे पूर्ण होत असताना, धम्माचा सखोल अभ्यास, आचरण आणि प्रसार यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “एक पाऊल अंधाराकडून प्रकाशाकडे, धम्म प्रगतीच्या वाटेकडे-चला, धम्म समजून घेऊया,” या भावनेतून बौद्ध उपासकांनी शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

शिबिरातील श्रामणेर प्रवज्जा विधी पूज्य भंते धम्मानंद बोधीजी (बौद्ध महासभा भिक्खू संघ) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. शिबिरार्थींसाठी चहा, नाश्ता, दुपारी १२ वाजण्यापूर्वी भोजन तसेच सायंकाळी ८ वाजण्यापूर्वी फलाहार अशा आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या बौद्ध उपासकांनी लवकरात लवकर नोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेच्या सातारा जिल्हा (पूर्व) शाखेने केले आहे.

शिबिरासाठी अध्यक्ष आयु. नानासो मोहिते सर, सरचिटणीस आयु. सुनील कदम, कोषाध्यक्ष आयु. नंदकुमार शिंदे, हिशोब तपासणीस आयु. बाळासाहेब जाधव, संस्कार उपाध्यक्ष आयु. अविनाश बारसिंग सर, संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे सर व आयु. अनिल कांबळे सर यांच्याशी संपर्क साधता येईल.
संपर्कासाठी – अध्यक्ष आयु.नानासो मोहिते सर (9604489058), सरचिटणीस
आयु.सुनिल कदम सर(8605044929),
कोषाध्यक्ष आयु.नंदकुमार शिंदे(9850597154),
हिशोब तपासणीस
आयु.बाळासाहेब जाधव सर (7448224181), संस्कार उपाध्यक्ष
आयु.अविनाश बारसिंग सर (8275048522), संस्कार सचिव आयु.सोमीनाथ घोरपडे सर (9284658690), संस्कार सचिव आयु.अनिल कांबळे सर (8087758674)

या श्रामणेर बौद्धाचार्य शिबिरास समस्त बौद्ध समाज, आढाववस्ती (गुणवरे) यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments