Monday, August 17, 2026
Homeसाताराडॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी S.I.T लावण्याची वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मागणी

डॉ.संपदा मुंडे यांच्या मृत्यूप्रकरणी S.I.T लावण्याची वंचित बहुजन आघाडी च्या वतीने मागणी


फलटण (ता. फलटण) : डॉ.संपदा मुंडे यांचा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या याबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात सत्य समोर यावे आणि डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली.
              या वेळी जिल्हाध्यक्ष भीमराव घोरपडे, उपजिल्हाध्यक्ष सुभाषराव गायकवाड, फलटण शहराध्यक्ष उमेश कांबळे, तसेच महिला आघाडीच्या उपाध्यक्षा चित्राताई गायकवाड उपस्थित होत्या. पदाधिकाऱ्यांनी डॉ. संपदा मुंडे यांचे वडील व चुलते यांच्याशी संवाद साधून घटनेची सविस्तर माहिती घेतली.
            यानंतर पोलीस उपनिरीक्षक फलटण विशाल खांबे यांची भेट घेऊन या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, दोषींवर कठोर कारवाई करावी व पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
खांबे साहेब यांनी यावेळी सांगितले की, “या प्रकरणी FIR दाखल करण्यात आली आहे व तपास सुरु आहे. तपासानंतर ज्याचा कोणाचा सहभाग आढळेल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
               वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले की, डॉ. संपदा मुंडे यांचा मृत्यू प्रकरण न्यायालयीन पातळीवर नेऊन सत्य उघड करणे व दोषींना शिक्षा मिळवणे, हीच खरी श्रद्धांजली ठरेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments