Wednesday, August 19, 2026
Homeदेश-विदेशDeath In Garba Celebration | गुजरातमध्ये गरबा खेळताना गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या...

Death In Garba Celebration | गुजरातमध्ये गरबा खेळताना गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

Death In Garba Celebration | गुजरातमध्ये गरबा खेळताना गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

गुजरातमध्ये गरबा खेळताना गेल्या 24 तासांत हृदयविकाराच्या झटक्याने 10 जणांचा मृत्यू!

गेल्या २४ तासांत गुजरातमधील विविध भागात नवरात्रोत्सवात गरबा करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे.

देशभरात नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. ठिकठिकाणी गरबा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये तरुणाईचा उत्साह पाहण्यासारखा आहे. मात्र, जिथे सर्वाधिक गरबा खेळला जातो त्या गुजरातमध्ये या उत्सावाला गालबोट लागलं आहे. गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत नवरात्रोत्सवादरम्यान गरबा खेळताना जवळपास 10 जणांचा मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये अल्पवयीन ते मध्यमवयीन लोकांचा समावेश आहे, ज्यात सर्वात लहान मुलगा दाभोई, बडोदा येथील 13 वर्षांचा मुलगा आहे. या घटनेनं तरुणांमध्ये चिंतेच वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा

शुक्रवारी अहमदाबादमधील २४ वर्षीय तरुण गरबा खेळत असताना अचानक कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. तसेच कपडवंज येथील एका १७ वर्षीय मुलाचाही गरबा खेळताना मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अशाच प्रकारची अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

या व्यतिरिक्त, नवरात्रीच्या पहिल्या सहा दिवसांत, 108 आपत्कालीन रुग्णवाहिका सेवांना हृदयाशी संबंधित समस्यांसाठी 521 कॉल आणि श्वासोच्छवासाच्या समस्यांसाठी अतिरिक्त 609 कॉल आले. हे कॉल्स संध्याकाळी 6 ते पहाटे 2 च्या दरम्यान रेकॉर्ड केले गेले, जेव्हा मोठ्या प्रमाणावर गरबा खेळला जातो.

यामुळे मात्र आता सरकार आणि कार्यक्रम आयोजक दोघांचीही  चिंता वाढली आहे. राज्य सरकारने गरबा स्थळांजवळील सर्व सरकारी रुग्णालये आणि सामुदायिक आरोग्य केंद्रांना (CHCs) अलर्ट जारी केला आणि त्यांना उच्च सतर्क राहण्याचे आवाहन केले.गरबा आयोजकांना देखील आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्रमात त्वरीत प्रवेश करण्यासाठी रुग्णवाहिकांसाठी कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिवाय, गरबा आयोजकांनी कार्यक्रमस्थळी डॉक्टर आणि रुग्णवाहिका तैनात करून सहभागींच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यांना त्यांच्या कर्मचार्‍यांना सीपीआर प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी आणि सहभागींसाठी पाण्याची मुबलक उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी देखील सल्ला देण्यात आला आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments