Wednesday, August 26, 2026
Homeसाताराठाकुरकी येथे विवाहितेवर प्राणघातक हल्ला: पतीसह गंभीर जखमी

ठाकुरकी येथे विवाहितेवर प्राणघातक हल्ला: पतीसह गंभीर जखमी

फलटण: ठाकुरकी (ता. फलटण) येथे २४ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५.३० वाजता एका विवाहित महिलेसह तिच्या पतीवर कोयता, लोखंडी फुकणी व लाथाबुक्क्यांनी हल्ला करण्यात आला. “तू इथे नांदायचे नाही” असे म्हणत सासूसह इतर पाच जणांनी मिळून हे प्राणघातक हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत विवाहिता गुड्डी अंकुश चव्हाण (वय ३०, रा. ठाकुरकी, ता. फलटण) व तिचा पती गंभीर जखमी झाले असून, गुड्डी चव्हाण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात लक्ष्मी लालासो चव्हाण, लालासो गणपत चव्हाण, भाऊसो लालासो चव्हाण, संचिता अंकुश चव्हाण, लता अंकुश शिरतोडे (सर्व रा. ठाकुरकी, ता. फलटण) आणि बाबु लव्हा शिरतोडे (रा. धुमाळवाडी, ता. फलटण) अशी आरोपींची नावे समोर आली आहेत.

या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस हवालदार राणी फाळके करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments