Wednesday, August 26, 2026
Homeसाताराबैलगाडा शर्यतीत तुंबळ मारामारी; ९ जणांच्या हल्ल्यात एक जखमी

बैलगाडा शर्यतीत तुंबळ मारामारी; ९ जणांच्या हल्ल्यात एक जखमी


फलटण :-जाधववाडी, ता. फलटण, जि. सातारा येथील साईबाबा मंदिरासमोर २५ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास वाढदिवसाच्या निमित्ताने भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीत हाणामारीची घटना घडली. या शर्यतीच्या मैदानावर एकाच गटात बैलगाडी पळवू नको असे सांगितल्यावरून शिवीगाळ, दमदाटी झाली. यानंतर विजय बबन मदने (वय ३५, रा. उमाजी नाईक चौक, फलटण) यांना सुमारे ९ जणांनी कोयता, काठी, हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले.

या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, मारुती पांडुरंग खोमणे, ऋषी तानाजी जाधव, विशाल विठ्ठल कडाळे, शामराव मदने, हणमंत शिवाजी जाधव, तेजस मारुती खोमणे (सर्व रा. कोऱ्हाळे खुर्द, ता. बारामती) आणि इतर तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

घटनेचा तपास पोलीस नाईक पूनम तांबे करत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments