Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेशCrime | रस्त्यावर उलटले पैशाने भरलेली वाहन; रस्त्यावर पडला नोटांचा खच...

Crime | रस्त्यावर उलटले पैशाने भरलेली वाहन; रस्त्यावर पडला नोटांचा खच | Navarashtra (नवराष्ट्र)

Crime  | रस्त्यावर उलटले पैशाने भरलेली वाहन; रस्त्यावर पडला नोटांचा खच | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

रस्त्यावर उलटले पैशाने भरलेली वाहन; रस्त्यावर पडला नोटांचा खच

आंध्र प्रदेशमधील धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यात कार्डबोर्ड बॉक्समध्ये तब्बल 7 कोटी रुपये लपवून घेऊन जात होते.

देशामध्ये लोकसभा निवडणूकीचे वारे वाहत आहेत. तीन टप्प्यातील मतदान देखील पार पडले आहे. अनेक ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशमधील धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यात कार्डबोर्ड बॉक्समध्ये तब्बल 7 कोटी रुपये लपवून घेऊन जात होते. मात्र नल्लाजरला मंडलातील अनंतपल्ली येथे एका ट्रकला धडकल्यानंतर टाटा एस वाहन उलटले आणि या रस्त्यावर पैशांचा खच पडला. त्यामुळे हे प्रकरण समोर आले.

विजयवाडाहून विशाखापट्टणमच्या दिशेने वाहन जात असताना ही घटना घडली. या गाडीमध्ये 7 पुठ्याचे बॉक्स जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. जप्त केलेली रक्कम सुमारे 7 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोपालपुरम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments