Monday, September 14, 2026
Homeब्लॉगउंच आकाशात उडणारे विद्याधरः बौद्ध शिल्पकलेचा अनमोल ठेवा"

उंच आकाशात उडणारे विद्याधरः बौद्ध शिल्पकलेचा अनमोल ठेवा”

“बौद्ध शिल्पकलेतील विद्याधरांची परंपरा: शिल्पांमध्ये जिवंत झालेली आकाशगंगा”भारतीय शिल्पकलेचा मानबिंदू म्हणजे “बौद्ध साहित्यातून” वर्णन केलेली “बौद्ध शिल्पकला”, जी आजही विविध शिल्पांमध्ये परावर्तीत झाली आहे. प्राचीन लेण्यांमध्ये कोरलेली ही शिल्पकला पाली साहित्यात “विद्याधर” म्हणून ओळखली जाते. विद्याधर सपत्नीक आकाशमार्गे सम्यक संबुद्धांना पुष्पवृष्टी करताना आणि त्यांच्या सेवेतील महत्त्वाचे घटक म्हणून चित्रित केले आहेत.

या शिल्पांमध्ये विद्याधरांना विविध प्रकारे कोरलेले पाहायला मिळते—सम्यक संबुद्धांच्या डोक्यावर मुकूट आणताना, तसेच दोन्ही बाजूंनी हवेतून येताना. शिल्पकारांनी अत्यंत बारकाईने आणि कौशल्यपूर्ण कामगिरी करून हे दगडांत कोरले आहे, जसे की आकाशमार्गे वेगाने उडत आलेल्या यक्ष आणि यक्षणींना दाखवताना त्यांचे वस्त्र वाऱ्यामुळे उडत असल्याचा भास निर्माण केला आहे. या विद्याधरांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य आणि त्यांचा उड्डाण करताना शरीराचा झुकलेला पोझ हा शिल्पकलेचा एक सुंदर नमुना आहे.

लेणी अभ्यासक सूरज रतन जगताप यांच्या मते, या शिल्पकलेचा अभ्यास केल्यास आपल्याला बौद्ध धर्माच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे महत्त्व समजते. आजही ही शिल्पकला आपल्या मनाला भावणारी आहे आणि ती प्रस्तरात जिवंतपणाचे भाव टिकवून ठेवत आहे.

शिल्पकलेचे अध्ययन करण्यासाठी लेण्यांमध्ये जाणे हे फक्त पर्यटन नाही तर एक अभ्यास आहे, ज्यामुळे आपल्याला या प्राचीन शिल्पकलेची खोली अधिक चांगल्या प्रकारे समजेल.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments