Sunday, September 20, 2026
Homeसाताराकास पुष्प पठारावर फुलांचा बहर: पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारा नजारा

कास पुष्प पठारावर फुलांचा बहर: पर्यटकांना मंत्रमुग्ध करणारा नजारा

फलटण प्रतिनिधी : यंदा जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम पाच दिवस उशिराने सुरू होत आहे. ५ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या हंगामात हजारो पर्यटकांना रंगीबेरंगी फुलांचे मोहक गालीचे पाहायला मिळणार आहे.

पर्यटकांसाठी प्रवेश शुल्क दीडशे रुपये असणार असून शालेय विद्यार्थ्यांसाठी फक्त चाळीस रुपये आकारले जाणार आहेत. विद्यार्थी सोमवार ते शुक्रवार या कालावधीत प्राचार्याच्या पत्रासह भेट देऊ शकतील, तर बारा वर्षांखालील मुलांसाठी प्रवेश मोफत आहे. कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांनी www.kas.ind.in या संकेतस्थळावर ऑनलाईन बुकिंग करणे आवश्यक आहे.

यावर्षीच्या हंगामासाठी सुमारे १३० स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षेची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशस्त पार्किंग आणि बसेसची सुविधा देखील पुरवली जात आहे. पर्यटकांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे मिनरल वॉटर, तसेच आरामासाठी सहा नैसर्गिक झोपड्यांची व्यवस्था केली आहे, ज्यामुळे त्यांना कोणताही त्रास होणार नाही.

सद्यस्थितीत पठारावर गेंद, सीतेची आसवे, सोनकी, चवर आणि टोपली कारवी यांसारख्या विविध फुलांचे बहर पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांत आणखी फुले उमलून पठारावर फुलांचे गालीचे तयार होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे कास पठारावरील या फुलोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी निसर्गप्रेमी उत्सुक आहेत.

पर्यटकांसाठी सूचना:
कास पुष्प पठार कार्यकारी समितीने पर्यटकांना ऑनलाईन बुकिंग करूनच पठारावर येण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून गर्दीचे नियोजन सुकर होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments