Friday, September 4, 2026
Homeसाताराविकासगंगेचा प्रवाह अविरत ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

विकासगंगेचा प्रवाह अविरत ठेवण्यासाठी भाजपच्या नेत्रतपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

फलटण : भारतीय जनता पार्टीच्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यात विविध योजना राबविल्या जात आहेत. मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोफत सायकल, भांडी किट आणि ‘लाडकी बहीण’ योजनेचा भाग म्हणून नागरिकांना लाभ मिळत आहे. या योजना यापुढेही कायम चालू राहाव्यात यासाठी भाजपचे विचारधारा असलेले आमदार निवडून देण्याचे आवाहन जिल्हा परिषद सदस्या अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर यांनी केले.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर भाजपच्या वतीने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उद्घाटन प्रसंगी अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर म्हणाल्या की, विकासगंगेचा प्रवाह अविरत ठेवण्यासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या विचाराचा आमदार निवडून दिला पाहिजे.

या शिबिरात २५०० नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली व त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच, १५० नागरिकांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी शिफारस करण्यात आली असून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

उद्घाटन प्रसंगी भाजप शहराध्यक्ष अनुप शहा, माजी नगरसेवक अजय माळवे, जिल्हा उपाध्यक्ष संदिप चोरमले, वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. अनिल श्रीवास्तव, खजिनदार अजिंक्य बेङके यांची उपस्थिती होती. सागर शहा, तानाजी कदम, राहुल पवार, अनुप पवार, तज्जमूल शेख, सुनिल पवार, रमेश मठपती, रमेश शिंदे आदी मान्यवर देखील उपस्थित होते.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments