Friday, September 4, 2026
Homeसातारारणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीसाठी फलटणमध्ये भाजपची तयारी!

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीसाठी फलटणमध्ये भाजपची तयारी!


फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि भाजपचे आघाडीचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे मुख्य उद्दिष्ट आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीवर चर्चा करणे आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेणे हे आहे.

फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, आघाडीचे नेते, महिला आघाडी, आणि तालुक्यातील महत्त्वाचे कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे पाटील यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर आणि भाजपच्या विजयी रणनीतीवर सखोल चर्चा होणार आहे.

तालुक्यातील सर्व प्रमुख भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन मंडल अध्यक्ष बजरंग गावडे आणि अमोल सस्ते यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments