Friday, September 4, 2026
Homeसाताराफलटण-कोरेगावमध्ये प्रचाराची रणधुमाळी, 'धनशक्ती विरुद्ध स्वाभिमान' संघर्षात बौद्ध समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी प्रा. रमेश...

फलटण-कोरेगावमध्ये प्रचाराची रणधुमाळी, ‘धनशक्ती विरुद्ध स्वाभिमान’ संघर्षात बौद्ध समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी प्रा. रमेश आढावांचे मनोबल उंचावले

फलटण :- २५५ फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी वाढली आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे दिग्गज नेते कोपरा सभा, घोंगडी सभा, पदयात्रा यांसारख्या प्रचार मोहीम राबवत असून, मतदारसंघ आश्वासनांनी गजबजलेला आहे. मतदारांनी मात्र यावेळी सावधगिरी बाळगून प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. “नेते तत्त्व विसरून बदलू शकतात तर सामान्य जनतेने का बदलू नये?” असा विचार आता मतदारांमध्ये पाहायला मिळत आहे.

महाविकास आघाडीचे उमेदवार दीपक चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समर्थक आणि बौद्ध समाजाच्या प्रतिनिधित्वासाठी संविधान समर्थन समिती पुरस्कृत प्रा. रमेश आढाव यांनीही निवडणूक मैदानात जोरदार उडी घेतली आहे. फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचे जेष्ठ पत्रकार म्हणून ओळख असलेल्या प्रा. आढावांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळत असून, त्यांच्या उमेदवारीमुळे बौद्ध समाजात उत्साहाचे वातावरण आहे.

प्रा. रमेश आढावांची निवडणूक ही ‘धनशक्ती विरुद्ध स्वाभिमान’ म्हणून उभी राहिली आहे. समाजाच्या आत्मसन्मानासाठी लढणाऱ्या आढावांच्या प्रचारात सामान्य जनता पुढे येत आहे. घरोघरी त्यांची खूण ‘रोड रोलर’ पोहोचली असून, मतदारांनी पाच क्रमांकावरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचा संकल्प केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments