
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण करणारे, विनोदी अभिनेते म्हणजे अशोक सराफ मालिका विश्वात कमबॅक करत आहेत. आपल्या अभिनयातून प्रेक्षकाना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या अशोक सराफ यांच्या या मालिकेविषयी उत्सुकता पाहायला मिळते. त्यांची ‘अशोक मा.मा.’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या मालिकेत त्यांच्यासोबत कोणती अभिनेत्री दिसणार हे स्पष्ट झाले आहे. सोशल मीडियावर एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.










