Aala Bailgada: आदर्श शिंदेच्या ‘आला बैलगाडा’ने होणार जल्लोष; ‘बिग हिट मीडिया’च्या गाण्याची जोरदार चर्चा!

0
154
Aala Bailgada: आदर्श शिंदेच्या ‘आला बैलगाडा’ने होणार जल्लोष; ‘बिग हिट मीडिया’च्या गाण्याची जोरदार चर्चा!


संगीतकार प्रशांत नाकती म्हणतो की, ‘नवीन रेकॉर्ड लेबल सुरू करण्याआधी निर्माता हृतिक अनिल मनी आणि निर्माती अनुष्का अविनाश सोलवट या दोघांनी खूप रिसर्च केलं. खूप महिने दोघांनी गाण्यांचा विषय काय असेल यावर काम केलं. अनेक गाण्यांचा अभ्यास केला. त्यानंतर त्या दोघांनी मिळून ‘बीग हिट मीडिया’ची निर्मीती केली. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती गाण्यामार्फत लोकांपर्यंत पोहचावी म्हणून, आम्ही सगळ्यांनी मिळून ‘आला बैलगाडा’ या गाण्यावर काम करायला सुरूवात केली. गाण्याची खासियत सांगायची झाली. तर, या गाण्यासाठी लाईव्ह बैलगाडा शर्यतीचा कार्यक्रमच आयोजित करण्यात आला होता. ‘बीग हिट मीडिया’च्या संपूर्ण टीमने या गाण्यासाठी अत्यंत मेहनत केली आहे. शिवाय लवकरचं हे गाणं तुमच्या भेटीला येईल.’



Source link