
Dinesh Phadnis Health Update: तब्बल २० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘सीआयडी‘ या मालिकेतील ‘फ्रेडी’ अर्थात अभिनेता दिनेश फडणीस याला हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. या दरम्यान अभिनेत्याची प्रकृती अत्यवस्थ असून, तो व्हेंटीलेटरवर मृत्यूशी झुंज देत असल्याचे समोर आले होते. मात्र, आता ‘सीआयडी’मधील दिनेश फडणीसचा सहकलाकार अभिनेता दयानंद शेट्टी याने ‘फ्रेडी’च्या तब्येतीबद्दल मोठा खुलासा केला आहे. दिनेश व्हेंटीलेटरवर असून, त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे, या वृत्ताला दयाने दुजोरा दिला. मात्र, त्याला हृदयविकाराचा झटका आलेला नाही, असे दयाने म्हटले आहे.








