Saturday, September 12, 2026
Homeसाताराफलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला उत्साही प्रतिसाद; आमदार सचिन पाटील यांचे पुतळ्यास...

फलटणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला उत्साही प्रतिसाद; आमदार सचिन पाटील यांचे पुतळ्यास अभिवादन

फलटण (ता. 14 एप्रिल) – साहस टाइम्स प्रतिनिधी “समतेच्या लढ्यातील अग्रदूताचा सन्मान!” अशा भावनेने भारलेला फलटण शहर आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीच्या निमित्ताने एकजूट झाली.

फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार सचिन सुधाकर पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार प्रत्येक भारतीयाने आपल्या जीवनात अंमलात आणले पाहिजेत.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्यावतीने या वर्षीचा महोत्सव विविध सामाजिक उपक्रमांसह साजरा केला जात असून, शहर व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. त्यामध्ये नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहीवळे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) फलटण शहर अध्यक्ष राहूल निंबाळकर, भाजप तालुका प्रमुख जयकुमार शिंदे, डॉ. प्रविण आगवणे, संदीप चोरमले, मंडल अध्यक्ष अमोल सस्ते, अमोल भोईटे, राहूल शहा, सणी मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या अभिवादन कार्यक्रमाला सामाजिक एकतेचा आणि संविधान मूल्यातील आस्था दृढ करणारा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments