Wednesday, August 26, 2026
Homeसाताराफलटण: जयमल्हार लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसाय प्रकरणी दोन अटकेत, एक फरार

फलटण: जयमल्हार लॉजवर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसाय प्रकरणी दोन अटकेत, एक फरार

फरांदवाडी (ता. फलटण) – जयमल्हार लॉजवर फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस आणि त्यांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात वेश्याव्यवसाय उघडकीस आला आहे. या कारवाईत १ लाख २६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक संशयित फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी १.५० वाजता, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जयमल्हार लॉज येथे छापा टाकला. या छाप्यात प्रविण रंगराव पवार (वय ३५, रा. विडणी, ता. फलटण), दिपक दत्तात्रय धायगुडे (वय २८, रा. सरडे, ता. फलटण) यांना अटक करण्यात आली असून राहुल सुर्यकांत सरगर (वय ५०, रा. मलटण, ता. फलटण) हा फरार आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून १ लाख २६ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेचीही सुटका करण्यात आली आहे.

पोलिसांचा इशारा: अशा गैरकृत्यांविरोधात कठोर कारवाई होणार

या कारवाईत फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय आणि निर्भया पथकाच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, तसेच स.पो. फी. अहिवळे, पो.ना. शेख, पो.कॉ. लयटे, मपो कॉ. तळपे, पो.हवा. भोसले, पो.कॉ. पवार, पो.कॉ. काकडे, चापोकों नाळे, मपोकों वलेकर यांचा सहभाग होता.

फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवावे आणि अशा प्रकारचे अवैध धंदे करणाऱ्यांविषयी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी. अशा कृत्यांना पाठीशी घातले जाणार नाही आणि कठोर कारवाई केली जाईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments