Wednesday, September 16, 2026
Homeमहाराष्ट्रबच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा: दिव्यांग हक्कांसाठी आंदोलनाची तयारी

बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा: दिव्यांग हक्कांसाठी आंदोलनाची तयारी

फलटण :माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या पदावर राहून दिव्यांग बांधवांचे प्रश्न सुटणार नसल्याची खंत व्यक्त करत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी आपला राजीनामा सादर केला.

दिव्यांगांच्या समस्यांसाठी आंदोलनाची तयारी
बच्चू कडू यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात स्थापन झालेल्या देशातील पहिल्या दिव्यांग कल्याण मंत्रालयाने अद्याप कार्यक्षमतेने काम केलेले नाही. दिव्यांगांसाठी पुरेशी पदभरती नाही, जिल्हा स्तरावर कार्यालये नाहीत, मानधन वेळेवर मिळत नाही, आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून 5% निधीही खर्च होत नाही.

दिव्यांगांवर होणारी बेईमानी सहनशील नाही
राजीनाम्याच्या पत्रात बच्चू कडू यांनी म्हटले की, “या पदावर राहून काहीच करता येत नसेल तर दिव्यांग बांधवांसोबत बेईमानी होईल. मला ती शक्य नाही.” त्यांनी त्यांच्या सुरक्षाही काढून टाकण्याची विनंती केली आहे.

राजीनाम्यानंतर आंदोलनाची तयारी
राजीनाम्यानंतर बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या हक्कांसाठी मोठे आंदोलन उभे करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे दिव्यांग समुदायाकडून त्यांना पाठिंबा मिळत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments