Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण-कोरेगावमध्ये प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या रूपात प्रगल्भ नेतृत्वाची गरज – राजकीय...

फलटण-कोरेगावमध्ये प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या रूपात प्रगल्भ नेतृत्वाची गरज – राजकीय लढ्याचे नवे पर्व

फलटण :- फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील सध्याच्या राजकीय वातावरणात प्रस्थापित पक्षांसह इतर सर्व उमेदवारांचा विचार केल्यास, या मतदारसंघाला एक सक्षम, प्रगल्भ, मुत्सद्दी व्यक्तिमत्त्वाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. या सर्व विचारात एकच नाव सतत पुढे येत आहे – प्रा. रमेश तुकाराम आढाव.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितींवर मात करत प्रा. आढाव यांनी आपली राजकीय कारकीर्द घडवली आहे. जातीयवादी राजकीय व्यवस्था आणि समाजातील असमानतेविरुद्ध त्यांनी सातत्याने संघर्ष केला आहे. आज संविधान समर्थन समिती, प्रहार, शिवराज्य आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याने प्रा. आढाव निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

बौद्ध, ओबीसी, भटके-विमुक्त, गरीब मराठा समाजातील मतदारांनी प्रा. रमेश आढाव यांना संपूर्ण पाठिंबा देण्याचे वचन दिले आहे. ही लढाई प्रस्थापित व्यवस्था आणि राजकीय हक्कांसाठी अन्याय सहन करणाऱ्या समाजाची आहे. प्रा. आढाव यांना निवडून आणण्याचे संकल्पित उद्दिष्ट म्हणजे या समाजाला न्याय व प्रतिनिधित्व मिळवून देणे आहे.

प्रा. रमेश आढाव हे एक अनुभवी राजकीय नेते आहेत. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या सल्लागारपदी असताना त्यांनी भारतीय रेल्वे आणि दूरसंचार विभागात जबाबदारीने कार्य केले. १९९७ मध्ये बी.टी. जगताप आणि प्रा. रमेश आढाव यांना दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद समितीवर नियुक्त करण्यात आले होते, जिथे त्यांनी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांचा कार्यभार सांभाळला.

फलटण-बारामती-लोणंद रेल्वेमार्गाच्या प्रस्तावात प्रा. रमेश आढाव यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. दिनांक २६ जून १९९६ रोजी त्यांनी मुंबईत तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन हा प्रस्ताव दिला होता, ज्याची अधिकृत घोषणा २१ नोव्हेंबर १९९६ रोजी झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments