Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाज उतरला मैदानात: हजारोंच्या उपस्थितीत अर्ज दाखलाची तयारी

फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीत बौद्ध समाज उतरला मैदानात: हजारोंच्या उपस्थितीत अर्ज दाखलाची तयारी

फलटणः २९ ऑक्टोबर २०२४ फलटण-कोरेगाव विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता तीव्र झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीतून सचिन पाटील आणि शरद पवार गटाकडून दीपक चव्हाण यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र, या प्रक्रियेत बौद्ध समाजाची दखल न घेतल्याने संविधान समर्थन समितीच्या वतीने आणि फलटण तालुक्यातील सर्व बौद्ध संघटनांच्या एकत्रित प्रयत्नातून बौद्ध समाज स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सज्ज झाला आहे.

उद्या मंगळवार, दिनांक २९ ऑक्टोबर रोजी, फलटण तालुक्यातील हजारोंच्या संख्येने समाजबांधव तहसील कार्यालयावर हजेरी लावणार आहेत. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक, महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाईल, आणि त्यानंतर तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला जाईल, अशी माहिती संविधान समर्थन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

या घटनेला मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून, बौद्ध समाजाने विधानसभेत आपला आवाज उठविण्याचा निर्धार केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments