Monday, October 26, 2026
Homeसाताराफलटण शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याचे आवाहन

फलटण शहरात दोन दिवस पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी पाण्याचा साठा करण्याचे आवाहन


फलटण :- फलटण, सोमवार पेठ येथील कॅनॉल वरील नवीन पुलाचे बांधकाम सुरू असल्याने फलटण शहरातील मुख्य जलवाहिनीचे स्थलांतर करणे आवश्यक झाले आहे. यामुळे फलटण नगर परिषदेच्या सूचनेनुसार शहरातील पाणीपुरवठा मंगळवार, ८ ऑक्टोबर २०२४ आणि बुधवार, ९ ऑक्टोबर २०२४ रोजी बंद राहणार आहे. या निर्णयाची माहिती मुख्याधिकारी तथा प्रशासन अधिकारी निखिल मोरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या निर्णयाचा परिणाम शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, रविवार पेठ, पाच बत्ती चौक, लक्ष्मी नगर, शिवाजीनगर, विद्यानगर, भडकमकर नगर, स्वामी विवेकानंद नगर, संत बापुदास नगर, हनुमान नगर, बारस्कर गल्ली आणि मारवाड पेठ या भागांवर होणार आहे. पाणीपुरवठ्याच्या गैरसोयीमुळे नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, सोमवार ७ ऑक्टोबर रोजी वरील भागांमध्ये नियमित वेळेपेक्षा २५ मिनिटे जास्त पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेला सहकार्य करत, पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments