Monday, September 14, 2026
Homeसाताराफलटणच्या श्रीमंत शिवाजीराजे स्कूलमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक राजवाड्याची भव्य प्रतिकृती साकार

फलटणच्या श्रीमंत शिवाजीराजे स्कूलमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक राजवाड्याची भव्य प्रतिकृती साकार

फलटण: श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, CBES जाधववाडी, फलटण येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी साकारलेली मनमोहन राजवाड्याची भव्य प्रतिकृती त्यांनी पाहिली आणि सर्वांचा गौरव केला.

प्रिन्सिपल दिक्षित मॅडम यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना या प्रतिकृतीच्या निर्मितीबाबत सविस्तर माहिती दिली. शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीने या प्रतिकृतीला मूर्त रूप दिले आहे. हा राजवाडा फलटणच्या राजेशाही गौरवाची झलक दाखवतो, आणि गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात तो पाहण्यासाठी येणाऱ्या गणेशभक्तांचे आकर्षण ठरत आहे.

राजवाड्याच्या डिझाइनमध्ये राजेशाही वास्तुशिल्पाची भव्यता स्पष्टपणे दिसून येते. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा आणि एकात्मतेचा उत्तम नमुना म्हणून ही प्रतिकृती शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावत आहे.

प्रिन्सिपल दिक्षित मॅडम यांनी सांगितले की, “या उपक्रमामागचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून देणे. मुलांनी त्यांच्या कल्पकतेचा आणि कौशल्याचा उपयोग करून ही प्रतिकृती साकारली आहे, जे त्यांचे एकत्रित प्रयत्नाचे प्रतीक आहे.”

या भव्य राजवाड्याची प्रतिकृती पाहण्यासाठी शाळेतील विद्यार्थी, पालक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, ज्यामुळे गणेशोत्सवाचा सोहळा अधिक उत्साही झाला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments