Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशरुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर...

रुग्णवाहिकेतच महिलेचा लैंगिक छळ; आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्टविनाच बाहेर फेकून दिलं, नंतर दागिने लुटले अन्…

[ad_1]

Crime News: पतीला रुग्णायलात घेऊन जाणाऱ्या महिलेशी रुग्णवाहिकेतच छेडछाड करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशात हा प्रकार घडला आहे. महिलेचा छळ केल्यानंतर रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी महिलेसह तिच्या पतीलाही रुग्णवाहिकेतून बाहेर फेकून दिलं. यावेळी त्यांनी आजारी पतीला ऑक्सिजन सपोर्ट काढून रुग्णालयाबाहेर फेकून दिलं. महिलेच्या पतीच्या गोरखपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

30 ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. महिला आपला पती हरिश आजारी असल्याने त्यांना घेऊन बस्ती मेडिकल कॉलेजात चालली होती. तेथील डॉक्टरांनी हरिश यांना वेगवेगळ्या रुग्णालयात रेफर केलं. यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडत होती. खासगी रुग्णालयांमधील फी परवडत नसल्याने महिलेने पतीवर उपचार करण्यासाठी पुन्हा घरी नेण्याचं ठरवलं. 

रुग्णवाहिकेत चालकाने महिलेला पुढे आपल्यासह बसण्याची जबरदस्ती केली. यानंतर त्याने आणि त्याच्या सहकाऱ्याने तिचा लैंगिक छळ केला. जेव्हा महिलेने विरोध करत आरडाओरड करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांनी तिच्या पतीचा ऑक्सिजन पुरवठा बंद केला. यानंतर पतीसह तिला रुग्णवाहिकेतून खाली फेकून दिलं. 

महिलेच्या आरोपानुसार, रुग्णवाहिकेच्या चालकाने तिचे दागिनेही चोरले. तिचा पती यादरम्यान गंभीर जखमी झाला होता. ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानंतर त्याची प्रकृती आणखी खालावली. महिलेने फोनवरुन आपल्या भावाला सगळा घटनाक्रम सांगितलं. यानंतर त्याने पोलिसांनी फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी जखमी हरिश यांना रुग्णालयात नेलं. पण तिथे त्यांचा मृत्यू झाला. 

पोलिसांनी आरोपी रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या सहकाऱ्याला अटक करण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही असा महिलेचा आरोप आहे. महिलेने लखनऊच्या गाझीपूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. 

लखनऊ उत्तरचे अतिरिक्त पोलीस महासंचालक जितेंद्र दुबे यांनी सांगितलं की, सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका महिलेने लखनौच्या गाझीपूर पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका कर्मचाऱ्यांच्या कथित मारहाणीबाबत तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आवश्यक कारवाई करण्यात येत आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments