Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशअंबानी मोठ्या मनाचे! अनंत-राधिकाच्या लग्नानिमित्त रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना मिळालं खास गिफ्ट

अंबानी मोठ्या मनाचे! अनंत-राधिकाच्या लग्नानिमित्त रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना मिळालं खास गिफ्ट

[ad_1]

Reliance Staff Receive Gifts : अनंत आंबानी आणि राधिका मर्चंट यांचा संगीत सोहळा जिओ वर्ल्ड सेंटर येथे पार पडला. या सोहळ्यात बॉलिवूड स्टार्स पासून ते क्रिकेटर्सनी हजेरी लावली होती. संगीत मागोमागच राधिका आणि अनंतच्या हळदीसमारंभही नुकताच पार पडला. या सोहळ्यात पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केलेली राधिका खुपच सुंदर दिसत होती. अंबानी कुटुंबाचे हळदीतील फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. अशातच आता राधिका आणि अनंत यांच्या लग्नानिमित्त रिलायन्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट मिळालं आहे. 

रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी मिळालेल्या गिफ्ट बॉक्सचे फोटो शेअर केले आहेत. बॉक्समध्ये नीता आणि मुकेश अंबानी यांचा एक संदेश आहे. आमच्या देवी आणि देवतांच्या दैवी कृपेने आम्ही अनंत आणि राधिकाचा विवाह साजरा करतोय, असं यावर लिहिलंय. तर भेटवस्तूमध्ये मिठाईचा बॉक्स आणि नमकीनचे चार पाकिट देण्यात आलेत. त्यामुळे आता रिलायन्सचे कर्मचारी आनंदी असल्याचं दिसतंय.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नापूर्वी, नीता आणि मुकेश अंबानी यांनी 50 जोडप्यांसाठी सामूहिक विवाह सोहळा देखील आयोजित केला होता, ज्यामध्ये प्रत्येक जोडप्याला सोन्या-चांदीचे दागिने, किराणा सामान आणि घरगुती वस्तूंसह 1 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. सामूहिक विवाह सोहळा पाहण्यासाठी अंबानींनी स्वत: या सोहळ्याला हजेरी लावली होती.

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याच्या गेस्ट लिस्टमध्ये बॉलिवूड कलाकार देखील मोठ्या प्रमाणात असणार आहेत. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कियारा अडवाणी, शाहिद कपूर, विकी कौशल, अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या सोहळ्याला येणार आहेत.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments