Saturday, October 17, 2026
Homeमहाराष्ट्रPune Crime : पुण्यात खाकीची उरली नाही भीती! सिंहगड रोडवर वाहतूक नियोजन...

Pune Crime : पुण्यात खाकीची उरली नाही भीती! सिंहगड रोडवर वाहतूक नियोजन करणाऱ्या पोलिसालाच दोघांनी केली मारहाण

[ad_1]

Pune Sinhgad road Crime : पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. रोज मारहाण, खून, दरोडे, फसवणुकीच्या घटना उघडकीस येत आहेत. आता पुण्याला सुरक्षित ठेवणारे पोलिस देखील असुरक्षित असल्याचं गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटनांवरून दिसून येत आहे. पुण्यात फरासखाना येथे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी कारवाई करत असतांना एका महिला पोलिसांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर आता, सिंहगड रोड येथे वाहतुकीचे नियोजन करत असणाऱ्या पोलिसांनी दोघांना हटकल्याने त्यांनी त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी अशी त्यांची नावे आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments