Gharoghari Matichya Chuli: सौमित्रच्या लग्नाची खबर ऐश्वर्याला लागणार! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आज होणार राडा

0
25
Gharoghari Matichya Chuli: सौमित्रच्या लग्नाची खबर ऐश्वर्याला लागणार! ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये आज होणार राडा

ऐश्वर्याला बसणार धक्का

आता जानकी आणि हृषिकेश दोघेही खोटं कारण सांगून आईला घेऊन मंदिरात जाणार आहेत. त्यावेळी वहिनी अजून घरी कशी आली नाही, हे विचारण्यासाठी सौमित्र जानकीला फोन करणार आहे. मात्र, जानकी तिचा फोन घरीच विसरून आली आहे. तीच फोन आता आजी ऐश्वर्याला देणार आहे. तर, सौमित्रचं लग्न आज आहे, हे कळल्यावर ऐश्वर्याला मोठा धक्का बसतो. आता निवांत बसलेली ऐश्वर्या तातडीने नानांना घेऊन सौमित्र लग्न करत असलेल्या मंदिरात घेऊन जाणार आहे. आता पुढे काय ड्रामा होणार, हे येणाऱ्या भागात कळणार आहे.

Source link