Sunday, October 4, 2026
Homeदेश-विदेशTheft Video Viral | धावत्या ट्रकमधून काही सेकंदात केली चोरी; घटनेचा VIDEO...

Theft Video Viral | धावत्या ट्रकमधून काही सेकंदात केली चोरी; घटनेचा VIDEO होतोय प्रचंड व्हायरल | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

धावत्या ट्रकमधून काही सेकंदात केली चोरी; घटनेचा VIDEO होतोय प्रचंड व्हायरल

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील आग्रा- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटारसायकलवरुन आलेल्या चिघांनी चालत्या ट्रकमधून चोरी केली आहे.

मध्य प्रदेशातील शाजापूर जिल्ह्यातील आग्रा- मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटारसायकलवरुन आलेल्या चिघांनी चालत्या ट्रकमधून चोरी केली आहे. चालत्या गाड्यांमधून चोरी करतानाचे सीन आपण सिनेमात पाहिले असतील. पण प्रत्यक्ष घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

अवजड सामान असलेला ट्रक हायवेवरुन ट्रक संत गतीने चालतोय. दरम्यान मागून बाईकवरुन आलेले चोर ट्रकच्या वर चढले आणि सामान चोरी करतायत असे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सामान चोरी करुन झाल्यानंतर चोरांनी तिथून पळ काढला आहे. सध्या ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.

चोरी पूर्ण होईपर्यंत ट्रक बाजूच्या लेनमध्ये चालवत राहिला आणि तिघे चोरटे खाली उतरले. मात्र चोरी केल्यानंतर चालकाने लेन बदलल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यामुळे ट्रकचालकावरील संशय अधिक बळावलाय. या घटनेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

चालत्या ट्रकमधून तीन चोरट्यांनी चोरी केली. आपल्याला कोणी पाहिलं नसेल असं त्यांना वाटतं होतं. ते तिघे देखील आपल्या चोरी करण्याच्या कामात मग्न होते. पण मागून चालणाऱ्या कार चालकाने हा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेरात कैद केलाय. आता व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड वेगाने व्हायरल झाल्याने या घटनेचा तपास केला जाईल. तसेच आरोपींनादेखील अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments