सम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून लेणी वाचवा चळवळीत काम करणारे : सूरज जगताप

0
26
सम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून लेणी वाचवा चळवळीत काम करणारे : सूरज जगताप

फलटण :बौद्ध धम्माच्या ऐतिहासिक वारसा लाभलेला व सूवर्ण इतिहासाची साक्षीदार असलेले पण सध्या दुर्लक्षित होत चालेले बौद्ध लेणी वाचण्याची चळवळ, वारसा आणि इतिहास वाचण्याचे जपण्याचे कार्य जे प्रमाणिकपणे व तळमळीने करत आहेत ते सम्यक सांस्कृतिक संघाचे संस्थापक अध्यक्ष बौद्ध लेणी अभ्यासक, संस्कृती रक्षक, कवी आणि मानवी मूल्यांची जोपासना करणारा सूरज रतन जगताप (लेणी अभ्यासक )

सह्याद्रीच्या कुशीत दडलेल्या अनेक लेण्या आहेत त्या दुर्लक्षित राहिला आहेत त्यांची दुरावस्था झाली असल्यामुळे हा संस्कृती वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे लेण्यांचे संवर्धन आणि जतन होणे ही काळाची गरज आहे आणि जोपर्यंत होते नाही तोपर्यंत महाराष्ट्रतील अनेक लेणी अभ्यासकांनी लेणी वाचवण्याची चळवळ हातात घेतली आहे . या चळवळीत अग्रभागी असे नाव ज्याचे आहे ते म्हणजे  सूरज जगताप यांचे नाव समोर येते . बौद्धेतिहासाचे गाढे अभ्यासक पुरातत्व उत्खनन आणि बौद्ध लेणी शिलालेख तज्ञ विश्लेषक महेंद्र शेगावकर हे सूरज जगताप यांचे गुरु आहेत . गुरु आणि शिष्य हे मिळून लेणी संवर्धनाच्या चळवळीत अतिशय आत्मीयतेने व तळमळीने काम करीत आहेत . सूरज जगताप सांगतात की मी माझ्या पूर्वजांच्या इतिहासाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतोय , त्यांनी कोरलेल्या कातळ शिल्पांची भाषा समजून घेण्याचा प्रयत्न करतोय , मला मिळालेले ज्ञान पुढच्या पिढीला देण्याचा प्रयत्न करतोय घडलेला खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करतोय . कातळ शिल्प बोलतात तुम्हाला त्यांची भाषा समजून घ्यावी लागेल त्यासाठी अथक परिश्रम करावे लागतील प्रयत्न करावे लागतील मी प्रयत्न करतोय तुम्ही ही करा

सूरज रतन जगताप हे व्यक्तिमत्त्व म्हणजे दगडाच्या प्रेमात पडलेले . कातळ शिल्पानाही बोलते करणारे ध्येयवादी , लोकांच्या मनात लेणी चळवळी विषयी जनजागृती व्हावी यासाठी तळमळीने काम करणारे जीवनगौरव व समाज भूषण पुरस्कारांनी सामनित असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सूरज जगताप यांनी सम्यक सांस्कृतिक संघाच्या माध्यमातून अनेक लेण्यांच्या ठिकाणी पितळखोरा लेणी, कुडा लेणी कार्ला लेणी , अजिंठा व वेरूळ लेणी यासारखा अनेक लेण्यांवर सहलीचे आयोजन करून लेणी संवर्धन जनजागृती चे काम ते करतात  तसेच पांथस्थ या यु टुब चॅनेलवरून अनेक लेण्यांना वर   जाऊन त्याठिकाणी लेण्यांच्या विषयी माहिती देण्याचे कार्य ते  सतत  करत असतात

लेणी संवर्धन , शिलालेख आणि बौद्ध संस्कृतीची पाळेमुळे शोधण्याच्या ध्यासाने प्रेरित झालेले व्यक्तिमत्व म्हणजे सुरज रतन जगताप (लेणी अभ्यासक ) यांना साहस टाईम्स परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ……