Sunday, August 16, 2026
Homeदेश-विदेशNIA Team | NIA च्या पथकावरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट; अधिकाऱ्यांवरच विनयभंगाचा...

NIA Team | NIA च्या पथकावरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट; अधिकाऱ्यांवरच विनयभंगाचा गुन्हा | Navarashtra (नवराष्ट्र)

NIA Team | NIA च्या पथकावरील हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट; अधिकाऱ्यांवरच विनयभंगाचा गुन्हा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

NIA Raid

NIA Raid

पश्चिम बंगालमध्ये भूपतीनगर येथे ‘एनआयए’ च्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी समोर आली होती. जमावाने केलेल्या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये भूपतीनगर येथे ‘एनआयए’ च्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना शनिवारी समोर आली होती. जमावाने केलेल्या दगडफेकीत वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच दोन अधिकारीही जखमी झाले होते. आता या घटनेत तपासासाठी गेलेल्या ‘एनआयए’ च्या अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

काही तासांनंतर आता पोलिसांनी एनआयएच्या अधिकाऱ्यांवर विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर पोलिसांनी शनिवारी रात्री भूपतीनगर पोलिस ठाण्यात एनआयएच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याच्या कुटुंबीयाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. एनआयए अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घराचे दरवाजे तोडून महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments