
भारताने अंतिम मुदतीपूर्वी माघारी बोलावले सैन्य
मालदिवला मदत करण्याच्या हेतूने भारताने हेलिकॉप्टर आणि विमाने दिली आहे. या साठि भारतीय लष्कराचे जवान मालदिवला होते. दरम्यान, आता हे सैन्य माघारी बोलावले जाणार आहे. दरम्यान, त्यांच्या बदल्यात तांत्रिक तज्ञांची भारताची पहिली नागरी टीम मालदीवमध्ये पोहोचली आहे. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी त्यांच्या देशातून भारतीय लष्करी जवानांच्या पहिल्या गटाला परतण्यासाठी १० मार्च ही अंतिम मुदत दिली होती. “प्रगत हलके हेलिकॉप्टर चालवणाऱ्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची पहिली टीम मालदीवमध्ये दाखल झाली आहे. हे हेलिकॉप्टर चालवणाऱ्या सध्याच्या कर्मचाऱ्यांची जागा घेईल,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितले.







