Arrest of Kochhar Couple | कोचर दाम्पत्याची अटक बेकायदेशीर; हायकोर्टाने सीबीआयला चांगलंच झापलं | Navarashtra (नवराष्ट्र)

0
29
Arrest of Kochhar Couple | कोचर दाम्पत्याची अटक बेकायदेशीर; हायकोर्टाने सीबीआयला चांगलंच झापलं | Navarashtra (नवराष्ट्र)


chanda kochar

आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने कर्ज फसवणूक प्रकरणात केलेली अटक मनमानी पद्धतीने आणि कायद्याचा विचार न करता केली होती.

मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सीबीआयने कर्ज फसवणूक प्रकरणात केलेली अटक मनमानी पद्धतीने आणि कायद्याचा विचार न करता केली होती. या प्रकरणी सीबीआयने अधिकाराचा गैरवापर केला, असे निरीक्षण मुंबई हायकोर्टाने नोंदविले आहे.

न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई आणि एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठाने 6 फेब्रुवारी रोजी कोचर यांची अटक बेकायदेशीर ठरवली होती आणि जानेवारी 2023 मध्ये त्यांना जामीन मंजूर करणाऱ्या अन्य खंडपीठाने दिलेल्या अंतरिम आदेशाची पुष्टी केली होती. न्यायालयाचा हा आदेश सोमवारी उपलब्ध झाला.






Source link