Sunday, August 30, 2026
Homeदेश-विदेशMamata Banerjee | 'इंडिया' आघाडीला मोठा झटका! बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवणार ;...

Mamata Banerjee | ‘इंडिया’ आघाडीला मोठा झटका! बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवणार ; ममता बॅनर्जींची घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

Mamata Banerjee | ‘इंडिया’ आघाडीला मोठा झटका! बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवणार ; ममता बॅनर्जींची घोषणा | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

‘इंडिया’ आघाडीला मोठा झटका!  बंगालमध्ये एकट्याने निवडणूक लढवणार ; ममता बॅनर्जींची घोषणा

ममता बॅनर्जी यांच्या म्हणण्यानुसार, “माझी काँग्रेसशी कोणतीही चर्चा झाली नाही. मी नेहमीच म्हटले आहे की बंगालमध्ये आम्ही एकटेच लढू. देशात काय होईल याची मला चिंता नाही पण आम्ही एक धर्मनिरपेक्ष पक्ष आहोत आणि बंगालमध्ये तेच असेल. भाजपचा एकहाती पराभव करण्याची आमची तयारी आहे. मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहुल गांधींची न्याय यात्रा आमच्या राज्यातून जात आहे, पण आम्हाला त्याची माहिती देण्यात आली नाही.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘इंडिया’आघाडीला मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस (TMC) च्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांचा पक्ष राज्यात एकट्याने निवडणूक लढवणार आहे. बुधवारी (२४ जानेवारी २०२४) ही मोठी घोषणा करून त्यांनी काँग्रेस आणि डाव्यांवर आपला राग काढला. ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, त्यांचे सर्व प्रस्ताव फेटाळण्यात आले त्यामुळे त्यांनी एकट्याने निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.

दीदींच्या म्हणण्यानुसार, टीएमसी बंगालमध्ये कोणाशीही समन्वय साधणार नाही. बंगालमधील काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेबाबत त्यांच्या पक्षाला कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच काँग्रेसने त्यांच्याशी याबाबत काहीही चर्चा केली नाही. सीएम ममतांनी जे काही प्रस्ताव दिले ते फेटाळले गेले. तृणमूल सुप्रिमो बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेसचा पश्चिम बंगालशी काहीही संबंध नाही. त्यांचा हा प्रस्ताव पहिल्याच दिवशी फेटाळण्यात आला.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments