
bharat jodo nyay yatra stopped in guwahati : आसाममध्ये काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत पुन्हा मोठा राडा झाला. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली ही यात्रा गुवाहाटी शहरात प्रवेश करत असतांना पोलिसांनी रोखली. दरम्यान, कॉँग्रेस कार्यकर्ते पुढे जात राहिल्याने तब्बल ५ हजार काँग्रेस कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक कॉँग्रेस कार्यकर्ते हे जखमी झाले आहेत. राहुल गांधींसह अनेक जणांवर विनापरवाना प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आणि गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सीएम हिमंता बिस्वा सरमा यांनी डीजीपीशी बोलून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.








