
फलटणमध्ये महिलांसाठी रंगणार ‘नऊवारी महोत्सव’; मराठमोळ्या संस्कृतीचा जागर
फलटण : शिवसेना व राजेनिंबाळकर यांच्या वतीने फलटण शहरातील महिलांसाठी विशेष ‘नऊवारी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या महोत्सवात महिलांसाठी विविध आकर्षक कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत श्रीराम मंदिरासमोर, मुधोजी मनमोहन राजवाडा चौक, फलटण येथे हा महोत्सव उत्साहात पार पडणार आहे.
नऊवारी साडी, पारंपरिक वेशभूषा आणि मराठी संस्कृतीची ओळख जपणाऱ्या विविध उपक्रमांमधून महिलांना आपल्या पारंपरिक संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. यावेळी उपस्थित महिलांसाठी आकर्षक भेटवस्तू तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
फलटण शहर व परिसरातील महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘नऊवारी महोत्सवा’चा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
