
[ad_1]
file photo
कराड : पुढारी वृत्तसेवा बीअर बारमध्ये झालेल्या वादावादीचा राग मनात धरून सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असणार्या ढेबेवाडीत ऋतुराज दिलीप देशमुख या युवकाचा खून करण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील कुसूर गावचा रहिवासी असलेला ऋतुराज हा ढेबेवाडीतील बीअर बारमध्ये बसला होता. त्यावेळी तेथे असलेल्या काही लोकांशी त्याची वादावादी झाली. वादावादीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या वादावादीनंतर संशयितांनी ऋतुराजला दमदाटी करत वांग नदीकाठी नेले आणि तेथे गेल्यानंतर ऋतुराजचा दगडाने ठेचून त्याचा खून केला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
काही वेळातच पोलिसांनी व स्थानिक नागरिकांनी जखमी ऋतुराजला उपचारासाठी रूग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या खून प्रकरणातील संशयितांचा ढेबेवाडी पोलिसांकडून शोध सुरू आहे.
हेही वाचा :
[ad_2]
Source link
